महाराष्ट्र में जवळा बाजार और शिरडशहापूर क्षेत्र मे

Gutkha seized Case: दोन ठिकाणी पानटपरीवरील छाप्यात गुटखा जप्त

जवळा बाजार/ शिरडशहापूर (Gutkha seized Case) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा ठेवल्याने जवळा बाजार व शिरडशहापूर येथे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता जवळा बाजार परिसरातील औंढा ते जवळा बसस्थानक रस्त्यालगत असलेल्या एका पानटपरीवर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शेख सलीम रोख हुसेन (रा. जवळा बाजार, औंढा नागनाथ, याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाल्याचा साठा आढळून आला.

या (Gutkha seized Case) कारवाईत विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू असा एकूण ३ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अमोल प्रल्हादराव इंगोले यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ तसेच भा.दं.सं. च्या विविध कलमान्वये औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाकूर हे करीत आहेत.

त्याच प्रमाणे शिरडशहापूर येथील बसस्थानक रस्त्यावरील कृष्णाई पान शॉप टपरीमध्ये संतोष पवार यांनी मारलेल्या (Gutkha seized Case) छाप्यात १०९५ रुपयाचा सुर्य छाप तोटा, गाय छाप तंबाखू, सिगारेट, बिडी असा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नामदेव रमेश पल्लेय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास घुगे हे करीत आहेत.