Parbhani burglary case: गंगाखेड तालुक्यातील सांगळे

परभणीतील सांगळेवाडी येथे घरफोडी; सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम पळविली...!

Parbhani burglary case

परभणी/ गंगाखेड (Parbhani burglary case) : तालुक्यातील सांगळेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम पळविल्याची घटना सोमवार २५ मे रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड तालुक्यातील सांगळेवाडी येथील सिताराम प्रल्हाद सांगळे यांचे कुटुंब सतत लाईट जात असल्याने रविवार २४ मे रोजी रात्री जेवण करून छतावर झोपी गेले असता रात्री ११ वाजेपासून ते मध्यरात्री २:३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीचा कोंडा तोडून त्यात ठेवलेले रोख एक लाख रुपये काढून घेत कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे सेव्हन पिस, अंगठी, कानातील झुंबर, नाकातील नथ असे एकूण अंदाजे १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे २५ ग्राम सोन्याचे दागिणे व रोख रक्कम मिळून २ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या (Parbhani burglary case) प्रकरणी सिताराम सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.