Parbhan Jewelry Scam: परभणीतील पाथरी शहरात नकली सो

परभणीत सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहात मंगळसुत्रही गमावले..

Parbhan Jewelry Scam

पाथरी शहरातील घटना; दोन अनोळखीवर गुन्हा दाखल

परभणी/ पाथरी (Parbhan Jewelry Scam) : परभणीतील पाथरी शहरात नकली सोन्याचे बिस्कीट देवून पाच ग्राम वजनाचे सोन्याचे असली मंगळसुत्र घेत एका महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास वाल्मीकी बँक जवळील टेंगसे रुग्णालयासमोरील रोडवर घडली. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसया बन्सी धनले वय ६५ वर्ष, या माहिलेने तक्रार दिली आहे. २४ जुलैच्या दुपारच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी संगणमत करत फिर्यादीला सोन्याचे बिस्कीट दिले. या बदल्यात ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणिमंगळसुत्र घेतले. महिलेने हे बिस्कीट तपासले असता सदर सोने नकली असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पाथरी पोलीस ठाणे गाठत दोन अनोळखी इसमांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पोह. रासवे करत आहेत. या अगोदर देखील फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. तरी देखील महिला, नागरीक भामट्यांच्या भुलथापांना बळी पडत आहेत. 

घरातून रोख रक्कम मोबाईल लंपास परभणी : शेळ्या विक्री करुन आलेली तीस हजाराची रक्कम आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्याने लंपास केला. ही घटना २१ जुलैच्या दुपारी बारा ते सायंकाळी पाच या दरम्यान सोनपेठ तालुक्यातील कारबेटवाडी येथे घडली. या प्रकरणी २४ जुलैला सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमाबाई करण चौधरी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीने आपल्या घरात तांदळाच्या डब्ब्यामध्ये सदर रक्कम आणि मोबाईल ठेवला होता. अनोळखी चोरट्याने सदर मुद्देमाल चोरुन नेला.