डीजे वाजवल्या प्रकरणी आयोजक व डीजे मालका विरोधात गुन्हा दाखल
वसमत (DJ Played Crime) : वसमत येथे डीजे लावून मर्यादेपेक्षा जास्त आवाज केला आणि ध्वनीप्रदूषण केले म्हणून मिरवणुकीच्या आयोजक व डीजे मालका विरोधात गुन्हा नोंदवला आहे वसमत शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वसमत मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य भव्य शोभा यात्रा मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीमध्ये डीजे वाद्य लावले होते यावेळी नियमाचे उल्लंघन झाले म्हणून तक्रार देण्यात आली आहे. वसमत शहर पोलीस ठाण्याचे विनोद शेषेराव दळवी यांच्या तक्रारीवरून (DJ Played Crime) डिजे जोर जोरात वाजवीत असतांना त्यांना पोलीसांनी आवाज कमी करणे बाबत वांरवार सांगुन सुध्दा आवाज कमी न करता डिजे वाद्य जोरात कर्ण कर्कशपणे मर्यादेपेक्षा आधिक आवाजात वाजवुन ध्वनी प्रदुषण केले व पोलीसांच्या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन कले. या तक्रारीवरून आयोजक अक्षय रमेशराव भोसले रा. भोसले गल्ली, वसमत, आणि विश्वनाथ सोनटक्के पिपरण ता. पुर्णा जि. परभणी (डि.जे. मालक) या दोघावर गुन्हा नोंदवण्यात आला. यावेळी विना नंबरचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील लहान मोठे ६ साऊंड बाँक्स (डी.जे.) ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी गिरासे करत आहेत.