धाड पोलिसांची तत्पर कारवाई; धामणगाव येथील मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड
बुलढाणा (Dhad Police Raid) : तालुक्यातील धाड पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव येथील श्री गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी धाड पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी फिर्यादी समाधान छगन पायधन (वय 59 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून कायमी अपराध क्र. 311/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल करून निलेश गणेश माहाले (वय 33 वर्षे, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यास ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीस गेलेला मुद्देमाल :
* लोखंडी दानपेटी – अंदाजे किंमत ₹1,500/- * दानपेटीतील रोख रक्कम – अंदाजे ₹6,000/-
एकूण चोरीस गेलेला मुद्देमाल : ₹7,500/-
हस्तगत मुद्देमाल :
* लोखंडी दानपेटी – अंदाजे किंमत ₹1,500/- * रोख रक्कम – ₹6,000/-
एकूण हस्तगत मुद्देमाल : ₹7,500/- (चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 100% मुद्देमाल हस्तगत).
धाड पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, भा.पो.से., माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड तथा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजिनाथ मोरे, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन धाड, सहायक फौजदार प्रभाकर लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुळे यांनी आरोपीस अटक केली.