Bori Police Action: बोरी येथे एकाच इंजेक्शनचा साठा

परभणीत टरमाईनच्या इंजेक्शनसह एक जण ताब्यात...?

Bori Police Action

बोरी पोलिसांची कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल

परभणी (Bori Police Action) :  बोरी येथे नशा करण्यासाठी टरमाईनचे इंजेक्शन विक्री करण्याकरीता स्वत: इंजेक्शनचा साठा बाळगलेल्या एकाला बोरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोमवार २९ जून रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास बोरी येथील दिक्षा भूमी समोर ही कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी पोलिसांचे (Bori Police Action) पथक गस्तीवर असताना या पथकाला एक इसम विना परवाना गुंगीकारक औषध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ ५ हजार रुपये किंमतीच्या टरमाईन च्या इंजेक्शनचा साठा मिळून आला. संबंधिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद शोएब कुरेशी मोहम्मद अनवर असे सांगितले.

संबंधिताची विचारपूस केल्यावर त्याने सदरचे इंजेक्शन वसीम खान अक्तर खान याच्या जवळून आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मो. शोएब कुरेशी मो. अन्वर, वसीम खान अक्तर खान या दोघांवर बोरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. धोंडगे, पोउपनि. गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश जटाळ, साळवणे, कांबळे, मोरे, फरीन रंगरेज यांच्या (Bori Police Action) पथकाने केली.