परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!
परभणीत पालम तालुक्यातील घटना आरोपीवर गुन्हा दाखल
परभणी (Minor Girl Sexual Assault) : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील सादलापूर येथे घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपीने १३ मार्च २०२६ रोजी पिडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या सोबत संबंध ठेवले. या (Minor Girl Sexual Assault) प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन राम दत्ता वल्लपवाड याच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
लग्न कर म्हणत मुलीचा विनयभंग
परभणी : माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत अल्पवयीन मुलीला त्रास (Minor Girl Sexual Assault) देण्यात आला. तिचा हात पकडत विनयभंग करण्यात आला. या बाबत विचारणा केल्यावर मुलीची आई व इतरांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना २ जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील वझर आठवडी बाजार परिसरात घडली. पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नारायण समाधान मते याच्यावर बामणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.