Disabled Screening Camp: मानोरा येथे दिव्यांग बांधवांचे तपासणी शिबिराचे आयोजन!
गावागावातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन!
मानोरा (Disabled Screening Camp) : येथील पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक ५ मार्च रोजी गुरुवारला दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधने वाटपाकरिता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या (Disabled Screening Camp) शिबिराला खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या शिबिराला दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये मानोरा येथील पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधने वाटपाकरिता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या (Disabled Screening Camp) कार्यक्रमाला खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी तालुक्यातील गावागावातील दिव्यांग बांधवांनी तपासणी पावती व आधार कार्ड घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन बीडिओ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.