Farm Loan Waiver Yojana: हिंगोलीतील शेती योजनेच्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अँग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

Farm Loan Waiver Yojana

कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : राज्य शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना" अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका व खाजगी बँकांकडील कर्जमाफी पोर्टलवरील संभावित थकीत कर्ज खात्यांचा डेटा अपलोड करण्याचे काम राज्यस्तरावर पूर्ण झाले आहे. या संदर्भातील पुढील अंतिम कार्यवाही शासनामार्फत सुरू असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा (Farm Loan Waiver Yojana) लाभ मिळण्यासाठी अँग्रीस्टॅक पोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे अनिवार्य आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अँग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केल्यास कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असून, कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रका द्वारे कळविले आहे.