Farmer committed suicide: शेतातील नापीकी व कर्जाच्या चिंतेतून शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या
आखाडा बाळापूर (Farmer committed suicide) : कळमनुरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. तालुक्यातील कस्बे धावंडा येथील शेतकर्याने सततच्या नापिकीमुळे पिके वाया जात असल्याने पिककर्ज कसे फेडावे या चिंतेत (Farmer committed suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ मार्च रोजी सायंकाळी याबाबत आकस्मात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कस्बे धावंडा येथील शेतकरी रमेश यादवराव मिरासे (५४ ) यांनी सततच्या निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकी व यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके वाया गेल्याने बँकेकडून घेतलेले पिककर्ज कसे फेडावे या चिंतेने २ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात (Farmer committed suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटने बाबत १३ मार्च रोजी गणेश यादवराव मिरासे यांच्या माहीतीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, बिटप्रमुख राजेश घोंगडे करत आहेत. चालू मार्च महिन्यात कळमनुरी तालुक्यातील साळवा, बाभळी व कस्बे धावंडा तिन शेतकरी आत्महत्या घटना घडल्या आहेत. वाढत्या (Farmer committed suicide) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजे.