Hingoli krushi Kendra: हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी

हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे सलग दुसर्‍या दिवशीही बंद

Hingoli krushi Kendra

 

प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन, लिंकिंग' सह अटींना विरोध

हिंगोली (Hingoli krushi Kendra) : राज्यासह जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्य कृषी विक्रेते संघटनेने (माफदा) पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्हा सामील झाला आहे. सोमवार पासून सर्व कृषी सेवा केंद्रे  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून,दुसर्‍या दिवशी २८ एप्रिल मंगळवार रोजी जिल्ह्यातील ७५० कृषी केंद्र बंद होती. गेल्या चार-पाच वर्षांपासून खत कंपन्यांकडून होणारे लिंकिंग, अवैध बियाण्यांची विक्री आणि प्रशासनाचे जाचक नियम यांबाबत माफदा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, कृषी विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. धुळे जिल्हा सीड्स, पेस्टीसाईड्स, फर्टिलायझर डीलर्स वेलफेअर असोसिएशनने या बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. लिंकिंगमुळे शेतकर्‍यांना नको असलेली उत्पादने घ्यावी लागतात, तसेच अवैध बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होते. हा बंद केवळ विक्रेत्यांसाठी नसून शेतकर्‍यांच्या हितासाठीही आहे. शासनाने लेखी निर्णय घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असे माफदा'च्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी सांगितले. मे महिना जवळ येत असल्याने शेतकरी खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी सज्ज होत आहेत. अशा वेळी जिल्ह्यातील शेकडो (Hingoli krushi Kendra) कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्यास निविष्ठांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.