Chilli-growing farmer: पावसाळा लांबल्यामुळे उन्हाच

मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करून अखेर मिरची उपटून फेकताना शेतकरी

Chilli-growing farmer

बुलडाणा (Chilli-growing farmer) : तालुक्यातील मासरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली होती. सदर लागवड ही एप्रिल महिन्यात केली असून, यावर लाखो रुपये खर्च केले मात्र पावसाळा लांबल्यामुळे उन्हाच्या लहरीपणामुळे तळतळ त्या उन्हामुळे मिरची पीक धोक्यात येऊन त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आले आणि मिरची लागण्या अगोदरच  मिरचीच्या झाडांवर कोकडा सारखा रोग (Chilli-growing farmer) येऊन फुल कळी विनाच झाडे पोसावी लागली झाडे डोलदार झाली. मात्र फुलकळी आणि मिरची नाहीशी झाली.

मिरचीच्या उत्पादनासाठी लहान मुलाप्रमाणे मिरचीची लागवड करून खत, औषधी फवारणी तसेच विकतचे पाणी आणून मिरची जोपासली तीन महिने उन्हातान्हात ठिबक, मल्चींग, मिरचीचे रोप, मजुरी, फवारणी, खते असा लाखो रुपये खर्च करून अखेर सर्व खेळ निष्फळ ठरला. अखेर (Chilli-growing farmer) मिरचीने शेतकऱ्याच्या पदरी निराशा पाडली या परिसरातील जवळपास १०० एकर वरील मिरची शेतकऱ्यांनी काढून टाकली लाखोचा खर्च वाया गेला.  मिरची पिकाने शेतकऱ्यांना असे घडविले तेलही गेले ,आणि तूपही गेले, हाती दुपाटे राहिले अशी अवस्था या परिसरातील शेतकऱ्यांची पाहावयास मिळत आहे.