Unseasonal Rain Hailstorm: वरोरा तालुक्याील पिके अवकाळी पावसाने व गारपिटाने बाधित
वरोरा तालुक्यात अवकाळी पावसातील पिकांचे नुकसान
वरोरा (Unseasonal Rain Hailstorm) : आज अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटामुळे तालुक्यातील गहू, हरभरा व कापूस या पिकाचे अतोनात झालेले असून शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.
ऐन पीक काढणीच्या वेळेस व शेतात उभ्या असलेल्या पिकं आपल्या घरी येईल. या आतुरतेने प्रतीक्षा करणारी शेतकऱ्यांच्या आनंदावर विर्जन पडले. असून ह्या निसर्गाच्या कोप निर्माण झाला असून गारपिटामुळे व (Unseasonal Rain) पाऊसामुळे चना व गहू पिकांचे मोठे नुकसान केले आहेत. काही ठिकाणी गव्हाचे पीक पूर्णपणे झोपले गेले असून उभे होणे कठीण आहे तर हरभऱ्याच्या काढणी व्हायची आहे. त्याचे घाटे सुद्धा गारपीटाने खाली पडले असून, काही हरभराचे ढीग ओले झाले आहे. आमडी गावात गारपीट झाले असून, तेथे पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते.
शेतकरी हातबल झालेला आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. या (Unseasonal Rain) गारपीटात प्रामुख्याने माढेळी व वरोरा भागातील अनेक गावात आजच्या पवसाचा फटका बसला आहे..