भारताला मोठा धक्का? E20 इथेनॉल इंधन स्वीकारण्यास भूतानचा नकार
नवी दिल्ली (Bhutan Rejects Ethanol Fuel) : पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून बनवलेल्या E20 इंधनाला भारतात प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, यामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध ठिकाणांहून वाहने बंद पडण्याच्या आणि कमी मायलेज मिळण्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शेजारील भूतानने भारताचे हे नवीन इंधन सध्यापुरते स्वीकारण्यास नकार दिला आहे. (Bhutan Rejects Ethanol Fuel) भूतानने भारतीय तेल कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत भारतात सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे. तोपर्यंत त्यांनी त्याचा पुरवठा करावा. या निर्णयामुळे E20 पेट्रोलबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे.
भूतान पूर्णपणे भारतावर अवलंबून
भूतान आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या गरजांसाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांसारख्या भारतीय कंपन्या तिथे इंधनाचा पुरवठा करतात. आतापर्यंत भारत भूतानला उच्च-गुणवत्तेचे शुद्ध पेट्रोल पाठवत आला आहे. मात्र, जेव्हा भारतीय कंपन्यांनी 20% इथेनॉल असलेले E20 पेट्रोल पाठवण्याचा प्रस्ताव दिला. तेव्हा भूतानच्या व्यापार विभागाने ते सध्या स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे नितीन गडकरींच्या (Bhutan Rejects Ethanol Fuel) इथेनॉल मिश्रण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
जुन्या इंधन टाक्या हे सर्वात मोठे कारण
माहितीनुसार, भूतानच्या या निर्णयामागे त्यांची कालबाह्य (Bhutan Rejects Ethanol Fuel) इंधन साठवणूक प्रणाली हे सर्वात मोठे कारण आहे. देशाच्या डोंगराळ आणि दमट प्रदेशात अजूनही जुन्या स्टीलच्या भूमिगत इंधन टाक्या वापरल्या जातात. अधिकाऱ्यांच्या मते, या टाक्यांमधून पाणी गळती होण्याची शक्यता असते, ज्यामुळे E20 पेट्रोलसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
इथेनॉल सहजपणे शोषून घेतो ओलावा
तांत्रिकदृष्ट्या इथेनॉलमध्ये (Bhutan Rejects Ethanol Fuel) हायड्रॉक्सिल गट असतो. ज्यामुळे ते हायग्रोस्कोपिक बनते, म्हणजेच ते हवेतून आणि सभोवतालच्या वातावरणातून सहजपणे ओलावा शोषून घेते. E20 पेट्रोलमध्ये थोडे जरी पाणी मिसळले तरी ते वेगळे करणे कठीण होते. यामुळे स्टीलच्या टाक्या आणि पाईपलाईनचे वेगाने क्षरण होऊ शकते. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की याचा दीर्घकाळात इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो.
भारतात E20 पेट्रोलबाबत चर्चा सुरू
भारतातही E20 पेट्रोलबाबत (Bhutan Rejects Ethanol Fuel) वेगवेगळी मते समोर येत आहेत. अनेक मालकांचा, विशेषतः 2023 पूर्वी उत्पादित झालेल्या गाड्यांच्या मालकांचा दावा आहे की, E20 वापरल्यानंतर त्यांच्या वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि देखभालीचा खर्च वाढला आहे. तथापि, सरकारचा दावा आहे की, E20 मुळे इंजिनची कार्यक्षमता आणि पिकअप सुधारतो. या धोरणावर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, भारत E25 (25% इथेनॉल मिश्रित) इंधनाचीही वेगाने चाचणी करत आहे.