Asha Bhosle: आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत स

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार: CM देवेंद्र फडणवीस

Asha Bhosle)

मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

मुंबई (Asha Bhosle) : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. स्व. आशाताईंनी (Asha Bhosle) यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.  बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.