Shelgaon Jahangir Case: चिखली तालुक्यातील शेलगाव ज

शेलगाव जहांगीर प्रकरणानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडून जखमी महिलेची भेट

Shelgaon Jahangir Case

चिखली (Shelgaon Jahangir Case) : चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. संबंधित प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनेनंतर दलित पँथरचे नेते दीपक केदार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्या ॲड. शर्वरी तुपकर, विनायक सरनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत जखमी महिलेची विचारपूस केली आणि कुटुंबाला धीर दिला. व आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी महिलेची मुलगी प्रतीक्षा साळवे हिने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध करून आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या (Shelgaon Jahangir Case) प्रकरणात आपली भूमिका मांडत संबंधित व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रदीप मुरलीधर पाटील करीत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून, वस्तुस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.