सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख पटली
मयत नांदेड जिल्ह्यातील
आखाडा बाळापूर (Accident Unidentified Death) : कळमनुरी तालुक्यातील महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम जागीच ठार झाला होता सदर मयताची ओळख चौवीस तासांच्या आत पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शना खाली सोशल मीडिया माध्यमातून पोलीसांनी पटवून आज मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २४ जून अडीच वाजण्याच्या पुर्वी महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात कयाधू नदी पाण्यावरील पूलाच्या समोर कळमनुरीकडे जाणारे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाला होता.या अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिस निरीक्षक शरद मरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे,सागर वाढोणकर, पिराजी बेले पोलिस पथकाने परीसरात गावात माहिती देण्याबरोबरच वाटसफ ग्रुपमध्ये फोटो माहिती टाकली होती सदर वाटसफ ग्रूप फोटो माहिती मयत यांच्या सासुरवाडीतील नरवाडी येथील नातेवाईक यांनी बघून तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व ओळख पटली सदर मयत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील धारबा बाबुराव खंदारे असल्याचे स्पष्ट झाले अस बिट प्रमुख राजेश घोंगडे यांनी सांगितले.
सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख काही तासांतच पटली आहे.सोशल मिडिया फेसबुक,वाटसफ, इंस्टाग्राम माध्यमातून सदुपयोग घेतला तर तो उपयुक्त ठरतो.