Hingoli Agriculture Department: हिंगोली जिल्ह्याती

कृषी विभागाच्या कामगिरीबद्दल जिल्हा सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन तर्फे सत्कार

Hingoli Agriculture Department

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे विनापरवाना जिप्सम खता बाबत केली होती कारवाई

हिंगोली (Hingoli Agriculture Department) : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईबाबत  हिंगोली जिल्हा सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन हिंगोली च्या वतीने कृषी विभागाचे अभिनंदन करण्यात आले. १६ मे  रोजी कृषी विभागामार्फत कळमनुरी तालुक्यातील मासोड  येथे अनाधिकृत व निष्कृष्ट दर्जाचे जिप्सम खत शेतकर्‍यांना विनापरवानगी थेट गावात अनधिकृतितरित्या विक्री होत असताना केलेल्या धडक कार्यवाही केली ही बाब कौतुकास्पद आहे. भविष्यात यापुढेही आपल्या विभागामार्फत अशा अनधिकृत कृषी निविष्ठा विकणार्‍या लोकांवर कार्यवाही होत राहील असा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे संघटनेच्या वतीने नमूद केले आहे.दरम्यान  या कारवाई बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा गुण नियंत्रक लक्ष्मण काळे, तालुका कृषी अधिकारी पंकज राठोड, मनोहर, तालुका कृषी अधिकारी वाळके, जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद निलावार , सचिव ज्ञानेश्वर वानखेडे,  कोषाध्यक्ष पवन पातुरकर, उपाध्यक्ष राहुल झांजरी, सहसचिव संतोष आखरे, तसेच गणेश मुटकुळे, संतोष आखरे, रितेश अग्रवाल इत्यादी कृषी केंद्र चालक उपस्थित होते.