Tehsildar Sagar Nannaware: वसमत तहसीलदार पदावर निल

प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे यांच्याकडे वसमतच्या तहसीलदार पदाचा पदभार

Tehsildar Sagar Nannaware

वसमत (Tehsildar Sagar Nannaware) : वसमत तहसीलदार पदाचा पदभार पर्यवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी सागर सुभाष नन्नवरे यांनी सोमवारी स्वीकारला आहे त्यांची वसमत तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रशिक्षण कालावधीत सहा आठवड्यासाठी ते वसमचे तहसीलदार म्हणून कारभार पाहणार आहेत वसमत येथे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा महसूल विभागाचेअधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. वसमत येथील वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी या अवैध गौण खनिज प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यामुळे वसमतचे तहसीलदार पद रिक्त झाले होते रिक्त असलेल्या तहसीलदार पदावर  तहसीलदार म्हणून लातूर येथून प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर सुभाष नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे 18 मे रोजी त्यांनी रीतसर प्रभार स्वीकारला आहे. पर्यवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते लातूर जिल्ह्यात रुजू आहेत प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांची तहसीलदार (Tehsildar Sagar Nannaware) म्हणून वसमत येथे नियुक्ती करण्यात आली आहे सहा आठवड्यासाठी ते वसमतचे तहसीलदार म्हणून कारभार पाहणार आहेत  वसमतच्या इतिहासात पहिल्यांदाच तहसीलदार असताना निलंबित होण्याचा मान तहसीलदार शारदा दळवी यांनी मिळवला आहे त्यामुळे वसमत वसूल विभागाचे प्रचंड बदनामी झालेली आहे त्यांच्या काळात खाजगी इसमांच्या  माध्यमातून तहसीलच्या कारभारात कारभारात हस्तक्षेप व्हायचा ड्रायव्हरच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जायचे या सर्व प्रकारावर नवनियुक्त तहसीलदार सागर नन्नवरे त्यांना नियंत्रण मिळवावे लागणार आहे तरुण तडफदार अधिकारी म्हणून ते वसमत महसूल प्रशासनावर छाप पडतील वसमत चा नावलौकिक पुन्हा मिळवून देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे.