खा. संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उबाठा शिवसेनेकडून 'जोडे मारो' आंदोलन
हिंगोली (MP Sanjay Dina Patil) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसैनिकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती या आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांनी केले. (MP Sanjay Dina Patil) आंदोलना दरम्यान खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रतिमेला आणि पोस्टरला जोडे मारण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख , उपजिल्हाप्रमुखपरमेश्वर मांडगे, गणेश शिंदे, भानुदास जाधव, रवी पपन्नालू, शंकर घुगे, अनिल गीते, जगदिश पाटील, संतोष पोपळघट या प्रमुख नेत्यांशिवाय शिवसेना (उबाठा) पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.