Shiv Sena crackdown: खरीप हंगामाच्या तोंडावर खतां

खताचा काळाबाजार, पेट्रोल-डिझेल टंचाई व NEET पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा

Shiv Sena crackdown

हिंगोली ( Shiv Sena crackdown) : खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा कृत्रिम तुटवडा, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार आणि NEET पेपर लीक प्रकरणी संबंधितांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.  शेतकरी सेना, महाराष्ट्र प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम देशमुख यांनी 20 मे रोजी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद केले की, खरीप हंगाम तोंडावर असताना काही खत निर्मात्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. व्यापाऱ्यांनी खताचा अवैध साठा करून काळाबाजार सुरू केला आहे. काही पेट्रोल पंप चालक पेट्रोल व डिझेलचा काळाबाजार करून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे.लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून NEET ची तयारी करत आहेत. गरीब पालक पोटाला चिमटा घेऊन लाखोंची फीस भरतात. अशा स्थितीत पेपर लीक झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त झाले आहे. खताचा अवैध साठा करणारे, डिझेल-पेट्रोलचा काळाबाजार करणारे आणि NEET पेपर लीक करणाऱ्यांच्या घरावर तातडीने बुलडोझर चालवावा. या (Shiv Sena crackdown) तिन्ही प्रकरणांमुळे शेतकरी आणि विद्यार्थी देशोधडीला लागत आहेत.  हे निवेदन 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे देण्यात आले. NEET चा पेपर लीक करून विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करणारे, ऐन हंगामात खतांची भाववाढ करून काळा बाजार करणारे व्यापारी आणि पेट्रोल-डिझेलचा काळा बाजार करणाऱ्या पंप चालकांच्या घरांवर सरकारने तात्काळ बुलडोझर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम देशमुख यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. या (Shiv Sena crackdown) समाजकंटकांवर सरकारने सरकारी आवडती बुलडोझर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे पाटील, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जिल्हा प्रमुख अजय सावंत (उर्फ गोपु पाटील) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.