Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री ध

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation

सेनगाव पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

सेनगाव (Illegal sand transportation) : सेनगाव पोलिसांनी अवैध रेती वाहतुकी विरोधात मध्यरात्री धडक कारवाई करत दोन टिप्परांसह सुमारे २४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.  सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. ४ जुलै रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास मौजे मकोडी गावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी जनार्धन पंडीतराव खताळ रा. आडोळ, प्रकाश बाबाराव शिंदे रा. सुकळी बुद्रुक आणि नामदेव उत्तमराव पोले रा. उमरदरी यांनी संगनमत करून दोन टिप्परमधून कोणतीही वैध परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवून रेतीची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा आरोप आहे. कारवाई (Illegal sand transportation)दरम्यान पोलिसांनी दोन आयशर टिप्पर तसेच त्यामधील प्रत्येकी सुमारे तीन ब्रास रेती असा एकूण २४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, गौण खनिज अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. चव्हाण करीत असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.