Sambhaji Brigade Protest: लातूर जिल्ह्यातील शिकषण

लातूरमध्ये  संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन!

Sambhaji Brigade Protest

एमपीएससी पेपरफुटीची सखोल चौकशी करण्याची मागणी 

लातूर (Sambhaji Brigade Protest) : एमपीएससी पेपरफुटी, एमएचटी-सीईटी परीक्षेतील घोटाळा, टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करणे, सर्व ऑनलाइन परीक्षा बंद करून ऑफलाइन पद्धतीने घेणे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी सोमवारी संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात, मार्च २०२६ मध्ये झालेल्या एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एमएचटी-सीईटी परीक्षेतील परसेन्टल (सामान्यीकरण) पद्धत अन्यायकारक असून परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करून परीक्षा पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आणावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. प्रदेश संघटक उमाकांत उफाडे , जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रंजनाताई हसुरे, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष वैजिनाथ जाधव, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष रंजनाताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हाध्यक्ष राजकुमार माने, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष समाधान माने, जिल्हा सचिव इर्शाद शेख, जिल्हा संघटक सिद्धेश्वर तेलंगे, अनिता मनदुमले, जयश्री हांडे, राम रावणगावे, उत्तम फड, उमाकांत कोठारे, लातूर तालुकाध्यक्ष राम जगदाळे, निलंगा तालुकाध्यक्ष परमेश्वर बोधले, होळकर दत्ता, विकास जाधव, सुनीता सूर्यवंशी, शिरीष ढवळे, बळीराम चिंचकुटे पाटील, अमोल गवळी, सुजित बाबळसुरे, परमेश्वर नांगरे, महेश पाटील,आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेडचा कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.