Risod cylinder explosion: रिसोड तालुक्यातील वाघी ख

शॉर्टसर्किटने घराला आग लागून घरातील सिलेंडरचा स्फोट

Risod cylinder explosion

आगीचा भडका उठल्याने तीन घरांचे नुकसान

रिसोड (Risod cylinder explosion) : शॉर्टसर्किटने घराला आग लागून घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उठल्याने तीन घरांचे नुकसान होऊन, यामध्ये 5 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे घडली. या घटनेमध्ये एक महिला व एक लहान मुलीचा जखमिमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यादरम्यान मालेगाव येथील अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी गावातील नागरिकांनी प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या आगीमध्ये तीन घरांचे सुमारे 14 लाख 22 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून मिळाली आहे.

या (Risod cylinder explosion) आगीमध्ये शेख शाहरुख शेख मेहबूब वय 32, हाजराबी शेख शाहरुख वय 26,नसरा बी शेख शाहरुख वय 5, शेख जुबेर शेख रफीक वय 25, अब्दुल रहमान शेख मुबीन वय 26 हे भाजल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.या आगीमध्ये दोन म्हशी सुद्धा भाजून जखमी झाल्या आहेत. या आगीमध्ये रोख रक्कम 2 लाख 20 हजार,सोने चांदीचे दागिने 5 लाख 65 हजार यासह 3 फ्रीज,3 कपाट, 3 पलंग,3 वाशिंग मशीन,4 मोबाईल,3 सिलेंडर,60 टिन पत्रे, 4 लाकडी दरवाजे, अन्नधान्य, पेरणी साहित्य, 3 पाण्याचे टाकी, 3 कुलर,2 पंखे, कपडे इतर वस्तू, टीव्ही,2 शिलाई मशीन अशी जळून खाक झाल्याने सदर तिनही परिवारावर मोठे संकट ओढावलेले आहे.सदर घटनेनंतर आग पिढीताना शासकीय मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.सदर घटनेचा पंचनामा तलाठी घुकसे यांनी करून अहवाल तहसील कार्यालयात पाठवला आहे.

वाघी येथील (Risod cylinder explosion) आगीमध्ये जखमी शेख ज़ुबेर शेख रफिक याचे मागील महिन्यात 21 मे ला लग्न झाले असून नविवाहित जोडप्यांच्या संसार उपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाली या आगित नवविवाहितेचे कपडे दागिने यासह मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर आग लागल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींना तातडीने घराबाहेर काढून उपचारासाठी रवाना केले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. (Risod cylinder explosion) सदर प्रयत्न करत असताना सिद्धार्थ भालेराव हे उंचीवरून पडून तर शेख मुजाहिद यांचा हात भाजल्याने जखमी झाले. सदर आगिवर नियंत्रण साठी मदत करत असताना काही ग्रामस्थांना सुद्धा किरकोळ मार लागल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे.