Risod Youth Suicide: आमर शिराम गायकवाड या २६ वर्षा
रिसोडच्या युवकाने गळफास लावून केली आत्महत्या
रिसोड (Risod Youth Suicide) : राहत्या घरात गळफास लावून एका 26 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी 2 वाजता निजामपूर मार्गावरील कदम मळा येथे उघडकीस आली.अमर श्रीराम गायकवाड वय 26 असे मृत युवकाचे नाव असून, तो रिसोड शहरात ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास (Risod Youth Suicide) अमरने राहत्या घरी गळफास घेतल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यावेळी घरात अन्य सदस्य कोणीही नव्हते दरवाजा आतून लावलेला होता .घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह शिव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही