शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या गजानन कावरखे यांच्यावर पोलिसांनी बजावली हद्दपारीची नोटीस
हिंगोली (Gajanan Kavarkhe) : कोणत्याही ठिकाणी शेतकर्यांवर अन्याय होत असल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमांतून मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांनी वेळोवेळी आंदोलन करून शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका वठवली. परंतु त्यांच्यावरच पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्याबाबतची प्रस्तावित कारवाई केल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. मराठवाडा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांचे अनेक प्रश्न व अडचणी दूर करण्या करीता वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. वेळ प्रसंगी पदाधिकार्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. परंतु या गुन्ह्यांना न डगमगता पदाधिकार्यांनी शेतकर्यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन सुरूच ठेवले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उपविभाग हिंगोली ग्रामीण यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरीता प्रस्तावित हद्दपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.
या नोटीसमध्ये गजानन कावरखे (Gajanan Kavarkhe) यांच्यावर १४ गुन्हे दाखल असल्याचे नमुद केले असुन प्रामुख्याने गोरेगाव पोलिस ठाण्यासह सेनगाव व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेले १४ गुन्हेही न्याय प्रविष्ट असल्याचे नमुद केले आहे. शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या गजानन कावरखे यांच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली असल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.