Yelki Gram Panchayat Election: येलकी ग्रामपंचायत स

येलकी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सरळ लढतीत रणजित मोरे विजयी

Yelki Gram Panchayat Election

 

काळ्याची वाडी 4 सदस्य बिनविरोध

आखाडा बाळापूर (Yelki Gram Panchayat Election) : कळमनुरी तालुक्यातील येलकी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले 29एप्रिल रोजी निवडणूक निकाल घोषित झाला.अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत रणजित मोरे यांनी विजय मिळवून बाजी मारली.   कळमनुरी तालुक्यातील येलकी मोठी ग्रामपंचायत (Yelki Gram Panchayat Election) असुन येथील सरपंच पद अ.ज.राखीव आहे अडीच वर्षापूर्वी सरपंचपदी निवडून आले त्यांनी राजीनामा दिला होता यामुळे दोन वर्षापासून सरपंचपद रिक्त होते उपसरपंच यांच्याकडे पदभार होता. दरम्यान इतर ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रमाण येथील सरपंचपद पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यात सरपंच पदासाठी  भुरके संजय मदन व मोरे रणजित गंगाराम दोन उमेदवारांत सरळ लढत झाली. थेट जनतेतून सरपंच निवड होणाऱ्या निवडणूकीत कोण बाजी मारतो याकडे येलकी व परिसरातच लक्ष वेधले गेले होते .या निवडणुकीत मोरे रणजित गंगाराम हे थेट जनतेतून 665 मते घेऊन सरपंच म्हणून निवडून आले तर भुरके संजय यांना 471 मतदान मिळाले. या निवडणुकीत नोटाला 24 मतदान मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भगवान झरकर यांनी काम पाहिले.

दरम्यान येलकी बरोबर काळ्याचीवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक (Yelki Gram Panchayat Election) होते. यात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काळ्याचीवाडी ग्रामपंचायत 6 सदस्य पोटनिवडणुकीसाठी शोभा  कृष्णा खंदारे अ.ज.स्त्री,सखाराम माधव शेळके, अ.ज.,हिरा रघुनाथ फोपसे स.सा.स्त्री,रवी कीशन काळे अ.जा.हे चार अर्ज आले होते यामुळे बिनविरोध निवड झाली तर दोन सदस्य पद रिक्त आहे.येथे 6 जागा पैकी 5 जागा अर्ज आले होते एक अर्ज अवैध ठरला होता.