Harshvardhan Sapkal's protest: महाराष्ट्राच्या उपम

सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा चिखलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

Harshvardhan Sapkal's protest

​चिखली (Harshvardhan Sapkal's protest) : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी व अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिखली येथे तीव्र आंदोलन छेडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

​शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारी भाषा ही संस्कृती नाही आणि असा अवमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.

​या (Harshvardhan Sapkal's protest) निषेध आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, विधानसभा संपर्क प्रमुख मनोज दांडगे आणि तालुका अध्यक्ष संतोष परिहार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​महिलांचा आदर राखणे ही महाराष्ट्राची परंपरा असून अशा प्रकारे राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी करणाऱ्या नेत्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.