Kalmanuri fire: मार्च २२ रोजी शहरातील बाळासाहेब ठा

कळमनुरी न.प च्या उद्यानला भीषण आग; झाडांसह यंत्रणांचे मोठे नुकसान

Kalmanuri fire

प्रशासनाचे दुर्लक्षामुळे उधान झाले भक्कास

कळमनुरी (Kalmanuri fire) : शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानात दि. २२ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागून उद्यानातील गवतासह अनेक छोटी-मोठी झाडे जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाचा बेजबाबदार व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान, त्र्यंबक जाधव, मनोज नकवाल, राहुल इंगळे व मिलिंद पाईकराव यांनी तत्परता दाखवत आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला आणि (Kalmanuri fire) आग आटोक्यात आणण्यास महत्त्वाची मदत केली. त्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत उद्यानातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या (Kalmanuri fire) आगीत झाडांना पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेली ठिबक पाईपलाईन पूर्णतः जळून खाक झाली, तसेच काही लहान मुलांची खेळणीही जळाली आहेत. याशिवाय उद्यानातील आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर खराब झाली असून सार्वजनिक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या उद्यानात यापूर्वीही २४ डिसेंबर रोजी आग लागली होती, तसेच उद्घाटनापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र त्या घटनांचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. वारंवार आग (Kalmanuri fire) लागूनही प्रशासनाने कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्यानात ना योग्य देखरेख, ना अग्निसुरक्षा व्यवस्था — अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.