माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज वर्धा ये

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा दौरा; सेवाग्राम आश्रमाला भेट

President Visit

वर्धा (President Visit) : माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज वर्धा येथे आगमन झाले. सेवाग्राम येथील हेलिपॅडवर त्यांच्या आगमनावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी तसेच इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर राष्ट्रपतींनी सेवाग्राम येथील बापुकुटी आश्रमाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी आदी निवास, बा कुटी, बापुकुटी तसेच बापूंचे कार्यालय यांची पाहणी करून संबंधित माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला व वृक्षारोपण केले. यानंतर सूत कताई करून त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.