शिवसेना चिखली तालुका उपप्रमुखपदी संदीप नरवाडे यांची नियुक्ती
पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी; शिवसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
चिखली (Political Appointment) : शिवसेना चिखली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. सर्कल, चिखली तालुका) पदावर संदीप दत्तू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन शंकरराव मोरे यांनी नियुक्तीपत्र देत २० जून २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख संजय सोनवणे आणि जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप नरवाडे यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. चिखली तालुका) पदावर एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्याबरोबरच शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल शिवसैनिकांसह विविध स्तरांतून संदीप नरवाडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.