Pohradevi Nangara Museum: पोहरादेवी येथील बंजारा व

पोहरादेवी नंगारा संग्रहालयाच्या संचालनावरून वाद!

Pohradevi Nangara Museum

अल्फाकॉमला अंतिम कार्यारंभ आदेश द्या, अन्यथा ३० जुलैपासून आमरण उपोषण!

मानोरा (Pohradevi Nangara Museum) : पोहरादेवी येथील बंजारा विरासत नंगारा संग्रहालयाच्या संचालन आणि देखभालीवरून आता वाद पेटला आहे. सध्या काम करणाऱ्या अल्फाकॉम सर्विसेस इंडिया या कंपनीला अंतिम कार्यारंभ आदेश न देता नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली होत असल्याचा आरोप करत धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा सनियंत्रण समितीला इशारा दिला आहे. ३० जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.   धर्मगुरू बापुराव साहेबराव महाराज, धर्मगुरु रमेश तुकाराम महाराज आणि सामाजिक कार्यकर्ते मोन्टी विलास राठोड यांनी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे आहे की, गेल्या वर्षभरापासून अल्फा कॉम सर्विसेस इंडिया  ( Alphacom Services India ) ही कंपनी संग्रहालयाचे संचलन व देखभाल योग्यरीत्या करत आहे.  ४० ते ५० लाख रुपये खर्च  करून स्वच्छता मशिन बसवणे, रामनवमी यात्रेत पर्यटक व भाविकांसाठी मंडप, लोखंडी बॅरीकेटींग आणि लाकडी बॅरीकेटींग उभारणे, सनियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या १०० रुपये दराने तिकीट आकारून नियोजनबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करणे.   सनियंत्रण समिती वाशिम ने ई-निविदा काढली होती. मात्र कोणत्याही कंपनीने त्यात भाग घेतला नाही. अल्फाकॉम ( Alphacom ) ने मात्र स्वारस्य दाखवून ३- ३ महिन्याच्या अंतरिम आदेशावर काम सुरू ठेवले. आता राजकीय दबावामुळे आणि इतर मर्जीतील कंपनीला फायदा देण्यासाठी ही निविदा रद्द करून नवीन निविदा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.   ज्या कंपनीने वर्षभर चांगले काम केले, तिलाच अंतिम आदेश न देता मनमानी पद्धतीने निविदा रद्द करणे न्यायसंगत नाही,  अल्फा काम सर्विसेस इंडिया (Alphacom Services India) यांना तात्काळ अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात यावा,  दिल्ली येथील ( DESIGN HABITT ) डेसिग्न हॅबिट कंपनीने केलेल्या कामाच्या भ्रष्टाचाराची  चौकशी करण्यासाठी तज्ञ समिती नेमावी,  जर ३० जुलै २०२६ पर्यंत निर्णय न झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.   जगप्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा विरासत नंगारा संग्रहालयात संत सेवालाल महाराज, संत बावनाजी महाराज, संत रामराव महाराज तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्ण इतिहास दाखविला नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नंगारा संग्रहालयात (Pohradevi Nangara Museum) संत सेवालाल महाराज, संत बावनाजी महाराज, संत रामराव महाराज वसंतराव नाईक यांचा संपूर्ण इतिहास दाखविण्यासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात यावे. संग्रहालयात त्यांचा इतिहास नसल्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. नंगारा संग्रहालयातील संपूर्ण नंगारा भवन प्रकल्पाची रचना व उभारणी दिल्ली येथील  डेसिग्न हॉबिट ( DESIGN HABITT )  कंपनीने केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मिडिया मेस, मुविंग थियेटर, फ्लायिंग थियेटर व अत्याधुनिक तंत्रज्ञान बसविण्यात आले असले तरी यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गुणवत्ता नियंत्रण मंडळ, अमरावती यांच्याकडून वापरलेल्या वस्तू, मशिनरी व तांत्रिक बाबींची दरांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.  सध्या संग्रहालयाचे संचलन व देखभाल करीत असलेल्या  अल्फाकॉम सर्विसेस इंडिया (Alphacom Services India) या कंपनीला अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात यावा.  नंगारा संग्रहालय (Pohradevi Nangara Museum) पूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहे. परंतु प्रकल्प बनवित असतानाच संतांचा इतिहास वगळल्यामुळे पर्यटक आणि भाविक भक्तांना खंत वाटत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही यंत्रणा बंद असल्याने नंगारा भवनाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन नंगारा संग्रहालयाला खऱ्या अर्थाने "बंजारा संस्कृतीचे प्रतिक" बनवावे अशी मागणी करण्यात आली आहे.