Patur Municipal Council: पातूर नगर परिषद सार्वत्रि

पातूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत सभा

Patur Municipal Council

पातूर (Patur Municipal Council) : पातूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर सभा आज 15 मे रोजी दुपारी 3.00 वाजता पातूर नगर परिषद कार्यालयात (Patur Municipal Council) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून निवडणुकीसंदर्भातील नियम, आचारसंहिता आणि प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, नगर परिषद पातूर यांनी सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.