Parbhani Farmers' Hunger Strike: गोदाकाठ साखर कारख
परभणीत गोदाकाठ साखर कारखान्याविरोधातील शेतकर्यांचे उपोषण मागे...!
अर्ध्या शेतकर्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा उर्वरित रक्कम आठवडाभरात देण्याचे आश्वासन
परभणी (Parbhani Farmers' Hunger Strike) : पाथरी तालुक्यातील गोदाकाठ ऑर्गानिक साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले कासापुरी सर्कलमधील ऊस उत्पादक शेतकर्यांचे बेमुदत उपोषण शनिवार १० जुलै रोजी मागे घेण्यात आले.उपोषणादरम्यान कारखान्याच्या संचालकांच्या वतीने प्रशासनास लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार, ऊस पुरवठा केलेल्या सुमारे अर्ध्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर थकीत ऊस बिलाची रक्कम वर्ग करण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांची देयके पुढील आठवडाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलक शेतकर्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंदोलकांना नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.