Parbhani Branch Officer: अ‍ॅडव्होकेटे मल्टीस्टेट प

परभणीत शाखा अधिकार्‍याने केला दहा लाखाचा अपहार...?

Parbhani Branch Officer

अ‍ॅडव्होकेट मल्टीस्टेट पर्पज को.ऑप. सोसायटी लि. परभणीतील प्रकार...!

नवा मोंढा पोलिसात गुन्हा

परभणी (Parbhani Branch Officer) : अ‍ॅडव्होकेटे मल्टीस्टेट पर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा परभणी मध्ये आर्थिक अनियमिततेचा प्रकार पुढे आला आहे. शाखा अधिकारी याने सोसायटीची रक्कम बँकेतील सोसायटीच्या खात्यामध्ये जमा न करता अपहार करत सोसायटीची फसवणूक केली आहे. १० लाख २२ हजार २७० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शाखा अधिकार्‍यावर २ जुलै रोजी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   मनोज गंगाधरराव जोशी यांनी फिर्याद दिली आहे. सदर सोसायटीच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा आहेत. वकिलांच्या सेवेसाठी सोसायटी असून परभणी येथील शाखा २०१३ मध्ये स्थापन करण्यात आली. या शाखेत शाखा अधिकारी गैर व्यवहार करत असल्या बाबत अध्यक्षांना माहिती झाली. त्यानंतर अध्यक्षांनी फिर्यादीला शाखेतील आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याविषयी सूचना दिल्या.

शाखा अधिकारी अतुल काशीनाथ कासंडे याने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान सोसायटी मधील जमा असलेली रोख रक्कम ९ लाख १२ हजार, नॉनज्यूडिशीअल स्टॅम्प पेपर रक्कम ५२ हजार ६००, कोर्ट फी लेबल्स रक्कम ५७ हजार ६७० अशी एकूण १० लाख २२ हजार २७० रुपयांची रक्कम सोसायटीच्या बँक खात्यामध्ये जमा केली नाही. सोसायटीने दिलेली जबाबदारी पार न पाडता रक्कमेचा आर्थिक अपहार करुन सोसायटीची फसवणूक केली. या प्रकरणी शाखा अधिकारी अतुल काशीनाथ कासंडे याच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.