Water Supply Andolan: चिखलीतील मंगरूळ परिसरातील ग्

पाणीप्रश्नावर ग्रामस्थांचे उपोषण सुरू; पंचायत समितीसमोर आंदोलन

Water Supply Andolan

चिखली/ बुलढाणा (Water Supply Andolan) : तालुक्यातील मंगरूळ (खेडे) परिसरातील ग्रामस्थांनी प्रलंबित पाणीपुरवठा व विकासकामांच्या मागण्यांसाठी अखेर उपोषणाला सुरुवात केली आहे. आज सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती चिखली कार्यालयासमोर सुमारे १३ ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. गावातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक कामे अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २०२० मध्ये खोदलेल्या विहिरी व बोरवेलचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच पाणीपुरवठ्यासाठी (Water Supply Andolan) आवश्यक वीज डीपी बसविण्याचा प्रश्न प्रलंबित असून, २०२१ मध्ये सुरू झालेल्या पाईपलाईनचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून गावाला सुरळीत पाणीपुरवठा करावा, ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, या (Water Supply Andolan) आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार तसेच इतर संबंधित विभागांना देण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उपोषणाच्या ठिकाणी नायब तहसिलदार मुरलीधर गायकवाड  पाणीपुरवठा विभागाचे वाघमारे पंचायत समितीचे व्हिडिओ गजानन पोपळे चर्चा केली आता वूत्त पर्यंत तोडगा निवडू शकला नाही