विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन; आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व
देसाईगंज (NEET Paper Leak) : नीट पेपर फुटी (Neet paper leak) प्रकरणी सोनम वांगचुंग यांच्या नेतृत्वाखाली न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या (Congress committee Aarmori Assembly) वतीने आमदार रामदासजी मसराम (Mla Ramdas Masaram) यांच्या नेतृत्वात रेल्वे बोगद्यानजीक पॉईंट वर भव्य रास्ता रोको आंदोलन (Rasta roko aandolan)करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. आंदोलनात, काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष विश्वजित कोवासे,माजी काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल,मनोज ढोरे,माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते, धनपाल मिसार सर,जयमाला पेंदाम, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, आरती लहरी, माजी उपसभापती नितीन राऊत, नगरसेवक श्याम उईके,दिलीप घोडम, मनोहर निमजे, सागर वाढई,ऋषि बगमारे, टोमेश्वर बगमारे, अक्षय बागडे, नंदू चावला हंसराज लांडगे, कैलास वानखेडे,आक्रोश शेंडे , परशुराम ठाकरे अमर भर्रे, साजन मेश्राम, संजय करांनकर, मेघराज बुराडे, सुरेश तोडफोड,नगरसेविका आशा दहिवले,नगरसेविका पठाण, रूपलता बोदेले, वैष्णवी आकरे,होमराज हारगुडे,आनंदशिंग चावला,प्रशांत अंकमवार,भास्कर कन्नाके,व्यंकट पेंदाम,योगेश नेवारे, श्रीरसागर शेंडे, प्रमोद मेश्राम,सागर बनसोड,श्रीकांत सूर्यवंशी, अंगराज बुद्धे, डोमाजी दिवठे, लुनकरण चौधरी,कमलेश बारस्कर,जावेद कुरेशी, ताजूल उके,दुर्वास नाईक,अनिल कोठारे,संजय कोसरे,विलास बुराडे,शैलेश बगमारे,जितेंद्र चौधरी, गजानन घरत,चारुदत्त राऊत,राहुल खरकाटे,धर्मेंद्र लाडे, कुंदन बोदेले, देवानंद सहारे,पराग लांजेवार,संकेत रामटेके,निलेश दुपारे, अथर्व राणे,देवनाथ सयाम,विशाल मेंढे, योगेश ढोरे, रुपेश टिकले, शैलेश येलगधवार,साजन मेश्राम,रमेश चौधरी,विशाल मसराम,मिथुन मेश्राम, गजू नाईक, राजकुमार मेश्राम,काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
याप्रसंगी आमदार रामदासजी मसराम यांनी, "विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील," असे सांगितले. रस्ता रोको आंदोलकाना पोलीस प्रशासनाने ताब्यात (arrested) घेतले.