बनावट नावामुळे नांदखेडच्या शेतकऱ्याची बदनामी; 'तो मी नव्हेच' म्हणण्याची वेळ
पातूर (Nandkhed Farmers' Fraud) : पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका शेतकऱ्याच्या नावाचा गैरवापर करून कोल्हापूर येथील व्यापाऱ्याची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने संबंधित शेतकऱ्यावर विनाकारण संशयाची छाया पडली आहे. या घटनेमुळे खरे गणेश इंगळे यांना वारंवार "तो मी नव्हेच" असा खुलासा करण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी एका आरोपीने स्वतःचे नाव गणेश रमेश इंगळे असल्याचे सांगत नांदखेड येथे आपल्या बहिणीला साडेतिन किलो सोन्याची नाणी सापडल्याची बनावट माहिती कोल्हापूरच्या युवराज काबळे या व्यापाऱ्याला दिली. स्वस्त दरात नाणी विकण्याचे आमिष दाखवत आरोपीने व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या (Nandkhed Farmers' Fraud) प्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात 342/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीने वापरलेले नाव नांदखेड येथील प्रत्यक्षात राहणारे शेतकरी गणेश इंगळे यांच्याशी जुळत असल्याने गावातील तसेच नातेवाईक, परिचित आणि विविध ठिकाणांहून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी सुरू केली. सुरुवातीला अनेकांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला; मात्र तपासात आरोपीने बनावट नावाचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या गणेश इंगळे यांचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले. तरीही या (Nandkhed Farmers' Fraud) घटनेमुळे गणेश इंगळे यांना अनेकांना खुलासा करावा लागत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे आणि सत्य सर्वांसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कोल्हापुरी येथील व्यापाऱ्याची सोन्याचे नाणे देण्याचे आम्हीच टाकून 15 लाख रुपयांनी फसवणूक केली आहे या प्रकरणातील आरोपी अद्याप मोखाड असून स्थानिक गुन्हे शाखा व पातुरांपासून पोलिसांसमोर या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान असून घटनेच्या दहा दिवसानंतर हे आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही