NCC Annual Camp: नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे
शंकर नगर येथे एनसीसीच्या वार्षिक शिबीरासाठी १० विद्यार्थिंनी रवाना
हिंगोली (NCC Annual Camp) : येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयातील छात्र सेनेच्या १० विद्यार्थिंनी नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे होणार्या शिबीरासाठी रवाना झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जून या कालावधीत एनसीसीचे वार्षिक शिबीर होणार आहे. या (NCC Annual Camp) शिबीरामध्ये हिंगोली येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका विद्यालयाच्या १० विद्यार्थिंनी फस्ट ऑफिसर सोनल जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाल्या आहेत. यामध्ये वाघमारे सांची शीलसागर, जगताप माहेश्वरी कैलास,वाघमारे माहेश्वरी माधव, घुगे ज्ञानेश्वरी दत्तराव,पिहू खडसे गौतम, गोगटे अपर्णा सुधीर, वाघमारे प्रांजल अश्विन, बोधनकर शिल्पा राजू, घ्यार प्रयुक्ता विजय, भवन पायल रमेश यांचा समावेश आहे.