SP ShriKrishna Kokate: नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबं

..अखेर श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड एसीबी पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती

SP ShriKrishna Kokate

हिंगोली (SP ShriKrishna Kokate) : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे हे कार्यरत असताना त्यांच्या जागेवर डॉक्टर निलाभ रोहन यांची नियुक्ती झाली होती २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला परंतु पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना कुठेही पदस्थापना दिली नव्हती. अखेर पाच महिन्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली.  हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ मध्ये नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणूक दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली त्याच्याच दुसर्‍या दिवशी २२ डिसेंबरला त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाने काढले २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी हिंगोलीत पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक कोकाटे (SP ShriKrishna Kokate) यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये दाद मागितली त्यावरून त्यांच्या बदलीला स्थगिती सुद्धा दिली होती. काही महिने मॅटमध्ये हे प्रकरण चालले एप्रिल व मे महिन्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी पदस्थापना देण्यात आली. या संदर्भात शासनाच्या गृह विभागाने २६ मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे.