Namdev Maharaj Palkhi: अषाढी एकादशीसाठी संत नामदेव

संत नामदेव महाराज पालखी  सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

Namdev Maharaj Palkhi

टाळ मृदंगाचा गजर, हजारो भाविकांची उपस्थिती 

हिंगोली (Namdev Maharaj Palkhi) : तालुक्यातील श्री क्षेत्र असलेल्या नर्सी नामदेव येथून  पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पायदळ पालखी दिंडी सोहळ्याचे ५ जुलै रविवारी रोजी विठ्ठल नामाचा गजर करत गावातील मुख्य मार्गावरुन पंढरपूरकडे रवाना झाला असून पहिला मुक्काम नर्सी नामदेव येथे झाला आहे.

दिंडी चालक हभप बळीरामजी महाराज सोळंके याच्या मार्गदर्शनाखाली  नर्सी नामदेव येथून प्रस्थान केले आहे.  दिंडी  गावातील मुख्य मार्गाने टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याची नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीत सहभागी ४०० वारकऱ्यांसह गाव व परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.  पालखीचा पहिला मुक्काम येथील काशिनाथ उफाड यांच्या निवासस्थानी असुन भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. रात्री भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

 पालखी दिंडी सोहळा नर्सी नामदेव (Namdev Maharaj Palkhi) ते पंढरपूर दरम्यान १९ ठिकाणी  मुक्काम होणार असून पाच ठिकाणी दिंडी सोहळ्याचा भव्य असा पालखी अश्व रिंगण सोहळा पार पडणार आहे. ६ जुलै रोजी पालखी पुढील प्रवासासाठी निघणार आहे सायंकाळी हिंगोलीत पालखीचा मुक्काम असणार आहे तर २४ ते २९ जुलै दरम्यान पालखी दिंडी सोहळ्याचा मुक्काम हा पंढरपूर येथे असणार आहे.