३३० के व्ही विधृत तारेचा शॉक लागुन इसम गंभीर जखमी
कन्हान (Live wire Shock) : कामठी वरून कन्हान वॉटर सप्लाय करिता जाणा-या ३३० केव्ही विधृत पुरवठा लाईन चा घराच्या छतावर फिरणा-या नकुल नानवटकर यांना अचानक विधृत तारेचा शॉक लागुन गंभीर जखमी झालेल्या इसमास मेयो रूग्णालय नागपुर येथे उपारार्थ दाखल करण्यात आले. गुरूवार (दि.१८) जुन ला सायंकाळी आंबेडकर चौक ते पिपरी रोड वरील आपल्या घरावरती फिरत असताना त्यांच्या घरावरून कामठी वरून कन्हान वॉटर सप्लाय करिता जाणा-या ३३० केव्ही विधृत पुरवठा लाईनचा अचानक विधृत शॉक लागुन गंभीर जखमी झालेले नकुल बालाजी नानवटकर वर्य ५५ वर्ष रा. विवेकानंद नगर पिपरी रोड कन्हान यांना प्राथमिक रूग्णालय कन्हान येथे नेल्यावर परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ मेयो रूग्णालय नागपुर येथे रेफर करण्यात आल्याने नागपुरला उपचारा करिता नेण्यात आले. कन्हान महावितरण अभियंता श्रीवास्तव यांना विचारले असता, त्यानी ही विधृत लाईन ३३० के व्ही किंवा ३३ हजारची असुन, कामठी विभागाअंतर्गत येत असुन जुनीकामठी वॉटर सप्लाय करिता जात असल्याचे सांगितले. यामध्ये विधृत तारेने धरम नगर कन्हान येथील आणखी एका इसमास शॉक लागुन त्याला सुध्दा उपचाराकरिता दाखल करण्याची चर्चा आहे.