SP Shrenik Lodha: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नाग

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

SP Shrenik Lodha

औंढा नागनाथ (SP Shrenik Lodha) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे हिंगोलीचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिनांक १३ जूलै मंगळवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान पूजा अभिषेक करत दर्शन घेतले व हेमाडपंथी मंदिराची पहाणी केली तसेच मंदिर बंदोबस्त अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (SP Shrenik Lodha) यांचा मंदिर संस्थान कडून श्री नागनाथ चा प्रसाद व मंदिराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे, जमादार संतोष पवार, जमादार रविकांत हारकळ, दिलीप नाईक, शाहेद सय्यद, अमोल चव्हाण, रमेश मस्के,पूजारी अभिजीत लोखंडे, महेश जोशी यांची उपस्थिती होती.