Murudla Municipal Council: मुरुडात वाढती लोकसंख्या

मुरुडला नगर परिषदेसाठी धिरज देशमुख आग्रही!

Murudla Municipal Council

ग्रामस्थ, नगरपरिषद संघर्ष समिती व काँग्रेस शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लातूर (Murudla Municipal Council) : मुरुड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात यावे, या मागणीसाठी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरुड ग्रामस्थ, मुरुड नगरपरिषद संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांना गुरुवारी (दि. २५) निवेदन दिले.   मुरुडची वाढती लोकसंख्या, बिगरशेती व्यवसायाचे वाढते प्रमाण, शासकीय व निमशासकीय कार्यालयांची उपलब्धता, दळणवळणाच्या सुविधा, व्यापारी आस्थापना, विविध बँका तसेच इतर नागरी सुविधांचा उल्लेख करण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करता मुरुड येथे नगर परिषद स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  याप्रसंगी मुरुड नगर परिषद कृती समितीचे प्रमुख डॉ. हनुमानदास चांडक, जयदीप सुरवसे, रामराव मोरे, शिवलिंग चौधरी, विष्णू टेकाळे, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई भिसे, २१ शुगरचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण, रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कापसे, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष उमेश बेद्रे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे, दत्ता शिंदे, माणिक गायकवाड, धनंजय देशमुख, महादेव मस्के, श्रीकांत माने, दीपाली आदमाने, शिवानंद पाटील, तानाजी जाधव, गुरुनाथ गवळी, अक्षय देशमुख, सत्यनारायण पाटील, प्रवीण पाटील, बाळासाहेब कदम, जनक गायकवाड, अमोल देडे, संतोष स्वामी, गणेश ढगे, बापू चव्हाण, नामदेव उफाडे, नितीन जाधव, या कार्यक्रमाला उपस्थित शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. दीपक पटाडे, दिनेश नवगिरे ( सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ), निलेश दादा फेरे ( कार्याध्यक्ष मुरुड ), ईश्वरप्रसाद चांडक,  अनंत कणसे ( सदस्य, ग्रा.कार्या.मुरुड ), संजय अंधारे, राजेंद्र मस्के( माजी सरपंच मुरुड ), अमोल गाडे, महेश भोसले, जगन चव्हाण, नरसिंग पुदाले तसेच महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सारिकाताई फेरे, मा. राणीताई खोडसे, मुरुड शहर युवक काँग्रेसचे शहर युवककॉंग्रसे अध्यक्ष मा. मुकेश बाबा सवासे, प्रशांत पिंपरे (कार्याध्यक्ष मुरुड) सुरज कांबळे ( उपाध्यक्ष मुरुड ), अक्षय जाधव, मोसिन मणियार  ( उपाध्यक्ष मुरुड ), चैतन्य पटाडे ( उपाध्यक्ष मुरुड ), समाधान गायकवाड, बालाजी सवासे,  गणेश जाडकर, आकाश देडे, विनोद पुदाले, इत्यादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मुरुडकरांच्या सह्याचे अभियान धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने मुरुडमध्ये नागरिकांच्या सह्यांचे अभियान राबविण्यात आले होते. मुरुडकरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासनाने नगर परिषद स्थापनेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून माहिती संकलित करताना केवळ २०११ च्या जनगणनेपुरती माहिती मर्यादित न ठेवता अद्ययावत आकडेवारीचा विचार करावा. तसेच मुरुड नगरपरिषद संघर्ष समितीने न्यायालयात सादर केलेली माहितीही ग्राह्य धरावी, अशी मागणी प्रतिनिधी मंडळाने केली. अधिवेशनात निर्णय घ्यावा! राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने त्यामध्ये मुरुड नगर परिषद स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी मांडली. नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने मुरुडला नगर परिषदेचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.