Missing Person Death: नांदेडच्या कळमनुरी तालुक्यात

तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला..

Missing Person Death

हदगाव जिल्ह्यातील नेवरी येथील भुसार व्यवसायिक व शेती करणारे प्रशांत इंगळे यांची पटली ओळख

आखाडा बाळापूर (Missing Person Death) : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या  नांदेड जिल्ह्यातील व्यक्तीचा मृतदेह कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा भागात रविवारी आढळून आला होता.डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सदर प्रकरणी रात्री अकस्मात मृत्यू नोंद करून पोलिस सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी- हदगाव तालुक्यातील सिमेवरील नेवरी ता.हदगाव येथील प्रशांत देवराव इंगळे (वय ३९वर्षे) हे भूसारचा व्यवसाय व शेती करतात हे ९ जुलै रोजी दुचाकीने  सायंकाळी नांदेडला जाण्यासाठी आखाडा बाळापूर मार्गाने निघाले होते परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत यामुळे त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरू केला होता यात ते वारंगाफाट्यापर्यंत पोहोचले असल्याचे दिसून आले होते याबाबत नातेवाईकांनी ही बाब पोलिसांना सांगितले १० जुलै रोजी मिसींग नोंद करण्यात आली असता त्यांचा शोध सुरू असताना रविवारी दुपारी वारंगाफाटा हदगाव रस्त्यावर एका नालीमध्ये मृतदेह आढळला  कोणत्यातरी अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाला.

प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले याबाबत बिट प्रमुख बालाजी जोगदंड माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर व बालाजी गोणारकर, प्रशांत शिंदे, बालाजी जोगदंड, पिराजी बेले पोलिस पथकाने भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर करत आहेत.