Parbhani Railway Theft: रेल्वेची गती कमी असताना अच

परभणीत खिडकीतून हात आला अन् लाख रुपयाची चैन लंपास

Parbhani Railway Theft

मानवत रोड रेल्वे स्थानकावरील घटना; अनोळखीवर गुन्हा दाखल मानवत रोड स्टेशन हा चोरट्यांच्या अड्डा बनला असून त्याच्यावर ठोस कारवाई लोहमार्ग पोलीस व वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष

परभणी (Parbhani Railway Theft) : मानवत रोड येथील रेल्वे स्थानकावरुन मराठवाडा एक्सप्रेस सुटली. रेल्वेची गती कमी असताना अचानक खिडकीतून अनोळखी इसमाने हात टाकून एका महिलेच्या गळ्यातून लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास केली. ही घटना २६ जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी २७ जुनला अनोळखी चोरट्यावर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी चंद्रकांत शेंदुरकर यांनी फिर्याद दिली आहे. त्या मराठवाडा एक्सप्रेसने छत्रपती संभाजी नगर ते नांदेड असा प्रवास करत होत्या. रात्री नऊच्या सुमारास गाडी मानवत रोड रेल्वे स्टेशनवर आली. येथून गाडी सुटल्यावर  गाडीची गती असल्याने याचाच फायदा घेत अनोळखी इसमाने खिडकीतून हात घालत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर रेल्वेत प्रवास करत असताना प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे दिसत आहे. (Parbhani Railway Theft) प्रवाशांजवळील मोबाईल, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू चोरटे लंपास करत आहेत. पूजा जैन या रायपूर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या जवळील पर्स चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये ८ हजार रुपये होते. त्याच प्रमाणे अलीम खान यांच्या जवळील ३२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि अंबादास चाफळे यांच्या जवळील ८ हजार रुपये िंकमतीचा मोबाईलही रेल्वे प्रवासात चोरी गेला आहे.