सामान उचलून घेण्याच्या कारणातून महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
हिंगोली (woman modesty Case) : सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये घरासमोर ठेवलेले सामान उचलल्याच्या कारणातून एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात चौघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये ३५ वर्षीय महिलेने तिच्या घरासमोरील सामान उचलून घेण्याबाबत आरोपीस म्हटले असता २२ जूनला शाब्दीक वादावादीची घटना घडून ४ आरोपींनी महिलेस मारहाण केल्यानंतर तिचा विनयभंग केला. यावेळी मारहाणीची घटना घडत असल्याने सदर महिलेच्या पतीने धाव घेऊन मधे आला असता त्यालाही लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात २४ जूनला दिलेल्या फिर्यादीवरून उत्तमराव राठोड, विकास उत्तमराव राठोड, अनुसया राठोड, वंदना राठोड या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गजानन पाचपुते हे करीत आहेत.