Gharkul Yojana: घरकुल योजनेत लाचखोरीचे प्रमाण मोठ्

घरकुल योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करा

Gharkul Yojana

पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते तात्काळ वाटप करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

मानोरा (Gharkul Yojana) : तालुक्यामध्ये घरकुल योजनेत लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून पंचायत समिती मधील बांधकाम विभागाच्या काही अधिकारी यांनी एजंट च्या माध्यमातून घरकुलाचे पेमेंट टाकण्यासाठी गरजू लाभार्थ्यांना सर्रास पैशाची मागणी केली जात असल्याचे समोर येत आहे. गोरगरीब साठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या तटपूंजी निधीतून जवळपास ३० टक्के निधी कमिशनच्या स्वरूपात वाटण्यातच खर्च होत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यामध्ये आहे.

कमिशन दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा हप्ता टाकण्यात येत नाही जे लाभार्थी कमिशन देत नाही त्यांचे पेमेंट काम पूर्ण होऊनही मुद्दाम रोखल्या जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना कमिशनच्या घेऊन निधी टाकला जात असून बोगस लाभार्थ्यांची घरे मात्र भरली जात आहे. त्यामुळे तात्काळ चौकशी करून दोषीविरुद्ध कार्यवाही करावी व तात्काळ पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, असे निवेदन प्रा. ओम बोलोदे यांच्या नेतृत्वात गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना दि. ३ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहे.  दिलेल्या निवेदनानुसार मोदी आवास , पंतप्रधान आवास (Gharkul Yojana) आणि रमाई आवास योजनेच्या निकषांना धाब्यावर बसून  काही लाभार्थ्यांना दुहेरी घरकुल तात्काळ देण्यात येत असल्याचे चित्र दिसत असून शासनाच्या नियमाची उघडपणे पायमल्ली केली जात आहे. घरकुल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलालाच्या माध्यमातून घरकुलाचे हप्ते मिळण्यासाठी सर्रास पैसे घेत असल्याचे सुद्धा चर्चा जोर धरत आहे या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

या सर्व प्रकारात अधिकारी व कर्मचारी आणि दलालांच्या संगनमताने दुहेरी घरकुल मंजूर करणे व पात्र लाभार्थ्यांनी कमिशन दिले नाही तर निधी हप्ते न टाकने  हे प्रशासनाचे नाकर्तेपणाचे लक्षण नव्हे का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे. या (Gharkul Yojana) प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी.  यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा ओम बलोदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.   निवेदनावरा सर्व पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पात्र लाभार्थी उपस्थित होते. यावेळी श्याम पवार, देवा बारसे, रामनाथ राठोड, नितेश लवटे, महेश राऊत, राम राऊत, वैभव गावंडे, सतीश राठोड, महेश राठोड, अशोक मनवर, सुनील चव्हाण, रामेश्वर चव्हाण आदीसह इतरांची उपस्थिती होती.