सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित वक्तव्याचा निषेध कळमनुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 'जोडे मारो' आंदोलन
कळमनुरी (Kalamnuri Jode Maro Andolan) : काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस पक्षाने संबंधित वक्तव्याबाबत तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या (Kalamnuri Jode Maro Andolan) निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे विजय गावंडे, बाजीराव सवंडकर, बाबुराव वानखेडे, मोहम्मद नाजीम रजवी, अब्दुला पठाण, अय्युब पठाण, आवेस पठाण, डॉ. दिलीप नाईक, ठाकूरसिंह बावरी, अरुण मेड, कैलास खिलारे, ॲड. तुषार पवार, ॲड. इस्तेखार नाईक, शेख आफजल, विनायक हेंद्रे, संतोष आमले, शेख मोहम्मद, तातेराव मगर, ज्ञानेश्वर फोले, मारोती, प्रदीप सवंडकर, शोयेब बागवान, मुस्तफा बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.