Marathwada Chhava Organization: अखिल भारतीय छावा स

छावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले

Marathwada Chhava Organization

केंद्रीय उपाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी, लातूर शहर जिल्हा अध्यक्षपदी बालाजी निकम

लातूर (Marathwada Chhava Organization) : अखिल भारतीय छावा संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले यांची तर लातूर शहर अध्यक्षपदी बालाजी निकम यांची निवड करण्यात आली. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या निवडीचे संघटनेतून जोरदार स्वागत होत आहे.  लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला, प्रदेश कार्याध्यक्ष मछिंद्रभाऊ चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विष्णु एनकफळे, लातूरचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख आकाश पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी (Marathwada Chhava Organization) संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्ष पदावर बालाजी दादा सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले, लातूर शहर जिल्हा अध्यक्षपदी बालाजी निकम, चाकूर तालुका सचिवपदी संतोष चिंचोळे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेकडो छावे उपस्थित होते.